सरस्वती विद्यालय येथे डिजिटल शाळेचे उद्घाटन



येथून जवळच असलेल्या कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयात डिजिटल शाळेचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले.             जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगावचे संस्थापक दिवंगत इंजिनियर किशोर मुरारी बारापात्रे यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त वर्ग ५ ते १० मध्ये ४३ इंची स्मार्ट टी. व्ही. संस्थेतर्फे लावण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पं.स.नागभीडचे सभापती प्रफुल्ल खापर्डे, सहउद्घाटक अशोक बोकाडे माजी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चंद्रपूर, अध्यक्ष कलाताई गोंदे माजी मुख्याध्यापिका, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप गोंदे माजी कार्यकारी अभियंता म.रा. वीज वितरण कंपनी चंद्रपूर, संस्थाध्यक्ष विजय बारापात्रे, सचिव मनिषाताई बारापात्रे, सदस्य डाॅ.सुधाकर नवलाखे, गीताताई बारापात्रे, संकेत व उत्कर्ष बारापात्रे, सरपंच दिवाकर खामदेवे, अमोल बावणकर, अनिता पेंदाम,रविंद्रनाथ पर्वते,मुख्याध्यापक दीपक बोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुरेश बोरकर तर आभार सुरेश खोब्रागडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!