मूल चे ऑक्सीजन प्लांट हवेतच?

मूल चे ऑक्सीजन प्लांट हवेतच?


फाईल फोटो

#Public_Panchanama
कोरोनाची (corona) दुसरी लाट राज्यातून अजूनही संपलेली नसताना, आणि तिसऱ्या लाटेचा धोका डोक्यावर कायम असतानाही मूल येथील ग्रामीण रुग्णालयात मंजूर झालेले ऑक्सीजन प्लांट (Oxyzen Plant) अजूनही हवेतच आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर देशात सगळीकडेच आॅक्सीजन प्लांटची निर्मिती होऊ लागली. मूल येथील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडे मूल येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करावी अशी मागणी लावून धरली.  या मागणीला प्रतिसाद देत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी  दोन कोटीचे वर खर्चाचे आॅक्सीजन प्लांटची मंजुरी दिली.  ही माहिती सोशल मीडियावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी वायरल केली. वर्तमानपत्रात काँग्रेस नेत्याच्या प्रेस नोट झडकल्या.  एका आठवड्यातच पालकमंत्री वडेट्टीवार यांनी खुद्द ग्रामीण रुग्णालय मूल येथे भेट देऊन पाहणी केली.  या घटनेला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही अजून पर्यंत ऑक्सीजन प्लांट ची एक वीटही लावल्या गेली नाही हे येथे उल्लेखनीय. 
याबाबत आमच्या प्रतिनिधीने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंदूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आॅक्सीजन प्लांट संदर्भात कार्यवाही ही जिल्हास्तरावरून होत असते असे सांगत ऑक्सीजन प्लांट चे काम अद्याप सुरू झाले नसल्याची बाब मान्य केली. पाहणी करण्यासाठी काही कंत्राटदार ग्रामीण रुग्णालय येथे आले होते, मात्र काम  सुरू झाला नाही. अशीही माहिती त्यांनी आमचे प्रतिनिधीला दिली.
ऑक्सीजन प्लांट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचे सोशल मीडियावर वायरल करणारे, काँग्रेस नेते राकेश रत्नावार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, आपण बाहेरगावी असून याबाबत लवकरच माहिती घेऊन कळवितो, असे आमचे प्रतिनिधीला सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!