चिमूर पंचायत समिती येथे स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (१ जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन'म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आनण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. कृषी विषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले होते. वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषी क्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळ निवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.या कार्यक्रमाला उपस्थित गजानन बुटके जि.प. सदस्य चंद्रपूर , रोशनभाऊ ढोक उप सभापती पंचायत समिती चिमूर , साळवे बी.डी.ओ. चिमूर, तालुका कृषी अधिकारी बी.पी.राठोड , तीके ,एस.सी.सहारे ,एस.एच. टाकरस आणि इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालय केसलवाडा ( वाघ ) ता. लाखनी जि. भंडारा चे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ चे विद्यार्थी कृषिदूत ओंकार एस. कोवे यांनी सहभाग नोंदवला. तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ च्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!