चिमुर कांपा रोडवर दुचाकी चा आमोरा - समोर भीषण अपघात
दोघांचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.27/06/2021 ला 12:00 वाजता च्या सुमारास चिमुर शहरातिल आर.टी.एम कॉलेज समोर दुचाकी - दुचाकीची समोरा - समोर जोरदार टक्कर होऊन दोघांचा जागेवरच मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी आहे.चिमुर वरुन कांपा कडे अजय महादेव राऊत व सनी छत्तीसगड हे एका दुचाकीवर कांपा च्या दिशेने चालले होते आणि अतुल चौधरी नाचणभट्टी हे आपल्या दुचाकीने कामानिमीत्य चिमुर ला येत होते या दोन्हा दुचाकी मध्ये समोरा - समोर जोरदार टक्कर झाली या घटनेत दोन व्यक्ती चा जागीच मृत्यू झाला पडले असून त्यात इंदिरा नगर चिमूर येथील अजय महादेव राऊत व सनी छत्तीसगड यांचा समावेश असून अतुल चौधरी नाचणभट्टी हा इसम जखमी असून त्यांचेवर उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरु आहे पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!