नगर परिषद अभ्यासिकेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले च नाव द्या - प्रशांत समर्थ यांची मागणी
नगर परिषद अभ्यासिकेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले च नाव द्या - प्रशांत समर्थ यांची मागणी
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल,
मुल शहरातील ताडाळा रोडवर प्रभाग 3 मधील सिद्धमशेट्टीवार ले आऊट येथे नगर परिषद ची अभ्यासिका तयार झालेली आहे, ही अभ्यासिका परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी या करिता प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी एका शिष्टमंडळाला घेऊन प्रशांत समर्थ यांनी केली आहे. आज नगर परिषद नगराध्यक्षा सौ रत्नमाला ताई भोयर आणि मुख्याधिकारी मेश्राम साहेब यांना भेटून एका पत्रकान्वये ही मागणी करण्यात आली. नगर परिषदेचे बांधकाम सभापती तथा भाजप नेते प्रशांत समर्थ यांच्यासमवेत भाजप कार्यकर्ते राकेश ठाकरे, प्रमोद महाडोळे, संतोष ठाकुरवार, विवेक मांडाळे, बादल करपे यांची उपस्थिती होती. ही मागणी पूर्ण करावी यासाठी शहरातील जनता लक्ष ठेवून आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!