ऑनलाइन योग व प्राणायाम प्रशिक्षणाचे आयोजन





 तळोधी (बा)(यश कायरकर) 
गेल्या वर्षभराच्या कोरोनाच्या  काळात रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी अनेक जण योग करतात पण ते कसे करावे किंवा योगाचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने दी रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी द्वारा संचालित लोक विद्यालय तळोधी येथील उपक्रमशील शिक्षक संतोष नन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन प्राणायाम व योग प्रशिक्षण घेण्यात आले.
     यावेळी संतोष नन्नावार यांनी 'श्वसन ही शरीराची महत्वाची क्रिया आहे. त्यामुळे योग्य श्वसन हे शरिराला ऑक्सिजन पुरवण्यास मदत करतो. यामध्ये मानसिक आरोग्य बळकट होण्यापासून पचनक्रिया सुधारण्यापर्यंत अनेक फायदे होतात. तर, जागतिक योग दिनाच्या दिवशी, भ्रामरी प्राणायाम सराव करून प्रारंभ करूया.  ‘ओम’ या आवाजाच्या स्पंदनांमधून १५% अधिक नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करते. हे यामधून कोविड -१९ पासून लवकर बरे होण्यास मदत करते. आज भ्रामरी प्राणायाम सह आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही मिनिटे द्या. त्यामुळे एकाग्रता सुधारते आणि चिंता कमी करते मनाला आराम देते आणि तणाव कमी करते. त्यामुळे आपल्या परिवार आणि मित्रांसह योग दिवस योग्य श्वासोच्छवासाने सुरू केला पाहिजे असे सांगितले.या आभासी योग व प्राणायाम प्रशिक्षणा करिता 5 ते 8 चे विद्यार्थी,विद्यार्थिनीं व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!