कळमगाव ते सोनेगाव (काग) रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात भ्रष्टाचाराची शंका

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - नगर परिषद चिमूर मध्ये समाविष्ट असलेल्या सोनेगाव (काग) येथून चिमूर, नेरी किंवा इतर कोणत्याही बाहेर गावास जाण्याकरिता एकमेव कळमगाव ते सोनेगाव (काग) हाच एकमेव रस्ता होता. त्यावेळेस सदर रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी चे लक्ष राहात होते. व रस्त्याची डागडुगी होत होती. चिमूर ते सोनेगाव (काग) ते नेरी या नवीन रस्त्याच्या निर्मिती नंतर आज हाच रस्ता प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या भ्रष्टाचाराचा कुरण बनला आहे.  विश्वस्त माहिती नुसार सदर रस्त्याच्या डागडुगी च्या नावावर वारंवार नियोजन करून रस्त्याची दुरुस्ती न करताच दुरुस्ती च्या नावाने मंजूर रक्कम प्रशासन व लोकप्रतिनिधी स्वतःच्या घशात घालीत असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत भारतीय क्रांतिकारी संघटनेचे कैलास भोयर सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचे छायाचित्र घेतले असुन अतिरिक्त माहिती संबधित कार्यालयातून मिळवुन रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याकरिता रितसर तक्रार करणार असल्याचे एका निवेदनाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!