प्रहार विद्यार्थी संघटना भद्रावतीच्यावतीने बी.डि.ओ. यांना निवेदन
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - दि.१४/०६/२०२१ प्रहार संघटना हि सदैव अन्याय विरूद्ध आवाज उठवणारी संघटना आहे. आगरा गावातील रहिवासी भैय्याजी मांडवकर यांच्या स्वमालकीच्या जागेवर त्यांचे चुलत भाऊ तुकाराम मांडवकर यांनी त्या जागेवर आपला हक्क दाखवत ति जागा आपल्या ताब्यात घेतले असून भैय्याजी मांडवकर यांनी ति जमिन आपल्या हक्कासाठी ग्रामपंचायत मध्ये शिफारस केली असता त्यांना उडवा-उडवी चे उत्तर देण्यात आले असून आज त्याच संबंधित प्रहारसेवक शेरखान भाऊ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती भद्रावतीचे बि.डी.ओ. यांना निवेदन देण्यात आले. व बि.डी.ओ. साहेबांनी ग्रामसेवक खोकरी यांना सांगुन त्या जमिनीचा हक्क भैय्याजी मांडवकर यांना मिळवुन देण्यात येणार असे आश्वासन दिले आहे. निवेदन देतांना प्रहारसेवक सौरभ काकडे, मारोती मांडवकर व मेघराज भोयर इ. प्रहारसेवक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!