वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
तळोधी बा./यश कायरकर
ब्रह्मपुरी वनविभागातील तलोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर हेटी बिटातील संरक्षीत वन कक्ष क्रमांक 691 मध्ये आकापुर येथील गुराखी खटू भानूजी कुंभरे वय ६५ वर्षे हा वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सदर गुराखी नेहमी प्रमाणे आपली गुरे घेऊन जंगलात गुरे चरण्यासाठी गेला होता. मात्र जंगलात चरत असलेल्या गाईवर वाघाने हल्ला केला असता त्या गाईला सोडविण्यासाठी गेला असता वाघाने गुराख्यास ठार केले.
मोका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करन्याकरीता नागभीड येथे पाठविण्यात आला.
सदर मृतक गुराख्या च्या कुटुंबाला 20000ची तातडीची मदत केली.
यावेळी तळोधी बाळापुर ते वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर .ढोंडणे क्षेत्र सहाय्यक के.डी. गरमळे ,गंगासागर बिठाचे वनरक्षक कुळमेथे, वनरक्षक चौधरी, आलेवाही बीड वनरक्षक पी. एम. गायकवाड, तळोधी वनरक्षक श्री पेंदाम इत्यादी वनरक्षक हजर होते. त्यानंतर मोक्याच्या ठिकाणी तिन कॅमेरे लावण्यात आले. तर तळोधी बा.पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री खैरकर यांच्या मार्गदर्शनात इतर पोलीस हे घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!