जिल्हा आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालय नागभीड येथील (CCC) कोविड केअर सेंटरला 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स उपलब्ध. तळोधी (बा)
तळोधी (बा)(यश कायरकर)
आज दि. ११ मे रोजी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथील (CCC) कोविड केअर सेंटरला 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध झाले.
नागभीड शहर व तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे व अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांची प्राणवायू पातळी कमी होतांना दिसत आहे. ही पातळी कमी होऊ नये व रुग्णाला निरंतर प्राणवायू मिळत राहावा, यासाठी प्राणवायू कॉन्सनट्रेटरच्या सहाय्याने रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा केला जातो. हे यंत्र थेट हवेतून प्राणवायू शोषून घेते व रुग्णाला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करते. त्यातच प्राणवायूची पातळी कमी असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करीत असतांना ग्रामीण रुग्णालय नागभीड येथील कोविड केअर सेंटरकरिता 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करण्यात आल्या असून.
सदर 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे मा. संतोषभाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड, मा. उमाजी हिरे नगराध्यक्ष न. प. नागभीड, आवेश पठाण सभापती कृ. उ. बा. समिती नागभीड, सचिन आकुलवार बांधकाम सभापती न. प. नागभीड, शिरीष वानखेडे नगरसेवक न. प. नागभीड यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका वैद्यकीय अधिकारी नागभीड डॉ. गावंडे व तालुका आरोग्य अधिकारी नागभीड डॉ. मडावी यांना सुपूर्द करण्यात आले.
तालुका आरोग्य प्रशासनाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गावंडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मडावी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!