राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मूल येथे रक्तदान शिबीर संपन्न
मूल येथे रक्तदान शिबीर संपन्न
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवू नये कोरोनाच्या पाश्चभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. त्या अनुषंगाने रक्तदान शिबीर संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा मुलच्या वतीने आज दि. 16 मे मुल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २० रक्तदाते रक्तदान केले तर ७ प्लाझ्मा दात्यांची नोंदणी करण्यात आली. उद्घाटनाला जिवन कोंतमवार, सचिन बल्लावार होते.
तर शिबिराला नंदु रनदिवे, प्रशांत समर्थ यांनी भेट दिली. प्रास्ताविक, आभार, संचालन किशोर कापगते यांनी पार पाडले तसेच स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.आरोग्य अधिकारी, वैधकीय अधिकारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या रक्तदानाच्या उपक्रमाच स्वागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये, रक्तसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!