चिमूर शहरात वार्डा वार्डा मध्ये पाण्याची भीषण टंचाई
_शहरातील नागरिकांना पाणी टंचाई फटका. मात्र चिमूर नगरपरिषद कुंभकर्णी झोपेत_
तालुका प्रतिनिधी
(केवलसिंग जुनी)
मो.न.८८८८२५४०१२
चिमूर शहरातील प्र .क्र .(२) काडकुडनगर
प्र .क्र (१५) अश्या अनेक वार्डात पाण्याची भीषण टंचाई आहे .वार्डातील नागरिकांना पाणी टंचाईचा झडा सोसाव्या लागत आहे .संपूर्ण देशात जनतेला एकीकडे कोरोना महामारीने जग लढत असताना मात्र चिमूर मधील प्र .क्र (२) काडकुड नगर येथील नागरिक पाण्या साठी भटकंती करत आहेत .चिमूर चे मुख्याधिकारी हे कुंभकर्णी झोपेत आहेत .पाणी समस्या सोडवण्यासाठी मुख्याधिकारी साहेबांशी वारंवार चर्चा करून सुद्धा समस्यांवर लक्ष घातले जात नाही .येथील पाणीपुरवठा यंत्रणा झोपी गेले कि काय ?
वार्डातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते .त्यातल्यात्यात नळाचा पाणीपुरवठा एकदिवस आळ केला जातो .त्यामध्ये पिण्यायोग्य पाणी नाही ,पाण्यामध्ये ब्लिचिंग नाही, टंकी ची अस्वच्छता .मात्र कर पूर्णपणे आकारला जातो .मग पाणीपुरवठा का नीट होत नाही ?काडकुडनगर येथील योग्य रीतीने पाणीपुरवठा केला जात नाही .असा सवाल सुरज नरुले यांनी नगरपरिषद प्रशासनाला केला .एकीकडे जनता महामारीच्या संकटात सापडली आहे आणि दुसरीकडे पिण्याच्या पिण्याच्या व घरगुती वापराच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे .नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे व चिमूर शहरातील पाणीपुरवठा रोज व्हायला पाहिजे जेणेकरून सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल .
----------------------------------------
चिमूर शहरात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असून काडकुडनगर येथील जनता पाण्या अभावी सुन्न आहे .आधीच दोनदिवस आळ पाणीपुरवठा होतो .तेही नळाला धार बरोबर राहत नसल्याने सामान्य जनता माझ्याकडे येऊन आपबिती सांगून राहिले असता नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे कि काय या पाणी समस्यांकडे नगरपरिषदेने जातीने लक्ष घालून चिमूर शहरातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे व जनतेला न्याय द्यावा .( सूरज नरुले भाजपा महामंत्री चिमूर )



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!