रासायनिक खत दरवाढीविरुद्ध तहसीलदारांना निवेदन:, निवेदनातून केंद्र सरकारचा निषेध




 तलोधी (बा.)(यश कायरकर) 
               नागभिड तालुका राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने  तालुका अध्यक्ष रघुनाथ बोरकर यांच्या नेतृत्वात रासायनिक खताच्या किमती मध्ये वाढ करुन  भारतातील शेतकऱ्यावर अन्याय केला तसेच पेट्रोल डिझेल गँस च्या किमतीत वाढ करुन सर्व सामान्याचे जगणे असह्य केले आहेत म्हनुन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागभिड ने नायब तहसीलदार रामटेके यांना निवेदन देण्यात आले.
   यावेळी अल्प.तालुका अध्यक्ष रियाज़ शेख, युवक शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख, अल्प. जिल्हा उपाध्यक्ष नासीर शेख, दिपक खोब्रागडे, विक्की मेश्राम, अखिलेश पाथोडे, साहिल मेश्राम,बबलु शेख,साहील शेख,विक्की मेश्राम, सरफराज शेख,आरीफ शेख तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे  कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!