चिमूर क्रांती दवाखान्याचे डॉ दिलीप शिवरकर यांनी चिमूर कोविड कंट्रोल सेंटर ला दिली सेवा
आज जगातील परिचारिका दिन निमित्ताने उपस्थित परिचरिकाना डॉ दिलीप शिवरकर यांनी शुभेच्छा दिल्या......
तालूका प्रतीनीधी
(केवलसिंग जुनी)
चिमुर:कोविड 19 दिवसेंदिवस वाढत असल्याने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या सह तालुक्यातील खाजगी वैधकीय व्यवसायिक डॉक्टर यांनी चिमूर कोविड कंट्रोल सेंटर ला सेवा देण्याचे शेड्युल जाहिर झाले असल्याने आज दि 12 मे ला चिमूर क्रांती दवाखान्या चे संचालक डॉ दिलीप शिवरकर यांनी कोरोना रुग्ण उपचार संदर्भात सेवा दिली .
डॉ दिलीप शिवरकर हे चिमूर येथील सिनिअर डॉक्टर असून त्यांनी आज कोरोना सेंटर ला सेवा देत तेथील उपस्थित असलेल्या डॉ. कु चौधरी ,परिचारिका व मावशी यांना कोरोना संदर्भात गाईडलाईन देत मार्गदर्शन केले .
आज जगातील परिचारिका दिन निमित्ताने उपस्थित परिचरिकाना डॉ दिलीप शिवरकर यांनी शुभेच्छा दिल्या......


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!