तळोधीच्या ठाणेदारांनी टाकलेल्या धाडीत 2,40,000/- रुपये किंमतीची 48 नग बोरी मोहफुलाचा सडवा जप्त





गोविंदपूर येथून जप्त केला दारू साठा ; दारू विक्रेत्यावर कार्यवाही

तळोधी (बा.) (प्रतिनिधी) 

               नागभीड तालुक्यातील गोविंदपुर येथील जंगलात मोह फुलाची दारू काढत असल्याची गोविंदपूर तंटामूक्त गाव समितीने दिलेली गुप्त माहिती मिळताच तळोधी  पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी सापडा रचून टाकलेल्या धाडीत 48 प्लास्टिक चुंगडी मोह फुलाच्या सडव्यासह (दारूची पास) इतर साहित्य रंगेहात मिळाले. याप्रकरणी दारू तस्कर हरीदास थेरकर देवा नेवारे,व निलेश थेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
                 गोविंदपूर हे जंगलव्याप्त गाव आहे.इथे मोठया प्रमाणात अवैध मोहफुलांची गावठी दारू बऱ्याच दिवसापासून  विकल्या जात होती. या संदर्भात गोविंदपूर तंटामुक्त गाव समितीने जंगलात मोहफुलांची दारू काढत असल्याची माहिती तळोधी पोलिसांना दिली. दरम्यान ठाणेदारांनी सापडा रचून सहकार्यासह टाकलेल्या धाळीत गोविंदपूर येथील सापेपार जंगलातील शेतशिवारात सडवून ठेवलेल्या 48 प्लास्टिकच्या  बोरीत दारूच्या पासा,प्रत्येक बोरीत 50 किलो मोहफुल  सडवा असे एकूण 2400 किलो मोह सडवा याची एकूण  किंमत 204000 रुपये  मोह दारू गाळण्याच्या साहित्यात  7 नग मोठे ड्राम,7 नग मोठे घमेले, 10 नग पिंप एकूण किंमत 3000 रुपये एवढे साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्याची एकूण किंमत 2,07,000 एवढी असून अवैध गावठी दारू तस्कर हरीदास थेरकर, देवा नेवारे, निलेश थेरकर रा. गोविंदपूर यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.यावेळी घटनास्थळी तंमूस. अध्यक्ष रमेश आळे व इतर सदस्यांची उपस्थिती होती.सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर, पोलीस हवालदार सतीश नेवारे, पोलीस शिपाई खैलेश कोरे, पोलीस हवालदार मोरेश्वर शिंदे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!