ग्रामीण रुग्णालय नागभीड अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील संपूर्ण उपकेंद्रात आक्सिजन व्हेंटिलेटर व कोविडं रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावे..
मा.आरोग्य मंत्री व राज्य शासनाला मा.संतोष भाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड यांनी केली मांगणी
तळोधी बा. (यश कायरकर)
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेले आहेत. नागभीड तालुक्यात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात वाढला असून आरोग्य सेवा दिवसरात्र काम करीत असून सुद्धा काही आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास असमर्थ आहे.
नागभीड तालुक्यात संचारबंदी करण्यात आलेली असली तरी कोरोनाचे रुग्ण दिवसांदिवस वाढत आहेत.व ते रुग्ण नागभीड तालुक्यात आरोग्य यंत्रणा मजबूत नसल्याने सर्व रुग्णांना चंद्रपूर येथे पाठवावे लागत आहे.
त्यामुळे नागभीड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे.म्हणून नागभीड तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव वाढत असतांना परिस्थिती लक्षात घेता शासनाने नागभीड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय नागभीड अंतर्गत येत असलेल्या सर्वच आरोग्य उपकेंद्रात जर आक्सिजन व्हेंटिलेटर व कोविडं रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले तर नागभीड तालुक्यातील कोरोना रुग्णांना सोयीस्कर होईल व ह्या महामारीच्या संकटात आक्सिजन करिता इकडे तिकडे भटकावे लागणार नाही.त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांना चंद्रपूरला न जाता तालुक्यातच उपचार घेता येईल.तसेच शासनाने तालुक्यात 45 वयोगटातील वृद्धांना कोविडं लसीकरण देत असतांना जर लवकरात लवकर सरसकट सगळ्यांना कोविडं लस दिली तर पुढे होणाऱ्या कोविड संक्रमनाला रोखण्यासाठी मदत होईल तरी कुठल्याही वयोगटाची अट न लावता सरसकट नागरिकांना लस देण्यात यावी तसेच तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करण्यात यावी.
म्हणून सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन *मा.आरोग्य मंत्री व राज्य शासनाला श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड* यांनी मांगणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!