वाघाच्या हल्ल्यात इसमाचा म्रृत्यू मोहफूल वेचने बेतले जिवावर
वाघाच्या हल्ल्यात इसमाचा म्रृत्यू
मोहफूल वेचने बेतले जिवावर
शशिकांत बतकमवार सिन्देवाही
सिंदेवाही प्रति। आज दिनांक 3/04/201 रोजी मौजा शीरकाडा तालुका सिंदेवाही येथील इसम नामे श्रीधर आत्राम हे सकाळी मोह फुल वेचण्या करिता शीरकाडाजंगल परिसरात गेले असताना पट्टेदार वाघाने त्यांचेवर हमला करून त्यांना ठार मारले. सदरची घटना ठाणेदार योगेश घारे यांना कळविली असता तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली. मृतकाचे नातेवाईक व स्थानिक ग्रामस्थ यांनी वनविभागाचे अधिकारी आल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य माननीय रमाकांत जी लोधे तसेच वन विभागाचे अधिकारी हे देखील दाखल झाले. मृतकाचे नातेवाईक यांना आर्थिक मदत माननीय रमाकांत जी लोधे यांचे हस्ते घटनास्थळी देण्यात आले. ग्रामस्थांच्या समस्या वन विभागाचे अधिकारी यांनी जाणून घेतल्या व त्या पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह हलवू देण्याची परवानगी दिली. सध्या घटनास्थळी शांतता आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!