वाढोणा हद्दीतील अवैद्य दारू विक्री बंद करावी दिले निवेदन




 तलोधी ( बा)
     नागभीड तालुक्यातील तलोधी(बा ) पोलीस स्टेशन अंतर्गत वाढोणा येथे अवैद्य दारू विक्रेत्यांचे प्रमाण खूप वाढले असून गावातील शांतता व सुव्यवस्था ढासळलेली आहे. त्यामुळे वाढोणा  हद्दीतील दारूविक्री बंद करण्याबाबत पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. 
  वाढोणा  परिसरातील दारू विक्रेते गब्बरसिंग बनले असून सामान्य नागरिकांवर अरेरावी करीत असून या दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून देण्यात आली. 
         यावेळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस डॉ.रघुनाथ बोरकर, सरपंच देवेंद्र गेडाम ग्रा.पं. वाढोणा, उपसरपंच भगवान बनसोड, तं.मु. स  अध्यक्ष दिनेश पगाडे, ग्राम.पं सदस्य अनिल डोर्लीकर, प्रदीप येसनसुरे, वासुदेव मस्के, मुखरू  मस्के आदी नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!