देवपायली येथिल नालीबाधंकाम निकृष्ठ दर्जाचे ग्रा.प. सदस्याच्या तक्रारीला केराची टोपली.
तळोधी(बा)(यश कायरकर)
नागभिड तालुक्यातील देवपायली ग्रामपंचायत अंतर्गत 14 वा वित्त आयोग योजनेतून नालीबांधकाम करण्यात आले व ते पुर्ण झाले मात्र सदर बाधंकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले व सदर बाधंकामाचे मुल्यमापन बाधंकामावर न येता ठेकेदाराचे हित लक्षात घेवून सबंधित विभागाचे अभियंता यांनी मुल्यमापन कसे केले ? असाही प्रश्न तक्रारकर्ता ग्रा.प.सदस्याना पडला आहे. सबंधित निकृष्ठ कामासर्दंभात नागभिड पंचायत समिती सभापती, व सवर्ग विकास अधिकारी यांना दि.1/4/2021 ला चौकसी करण्या बाबत तक्रार अर्ज केला असुन चौकशी सुध्दा झाली नसल्याचे सागितले आहे. सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होवूनही ग्रामपंचायत चे सरपंच, सचिव, यांनी कामाचे बिल कत्रांटदाराला दिले कसे ? असाही प्रश्न उपस्थित केला जात असुन 'दाल मे कुछ काला है।' असी चर्चा देवपायलीवासीय करत आहे. सदर नालीबांधकामाची चौकशी त्वरीत करण्यात यावी असी मागणी ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर नवघडे, सौ.वैशाली भोयर, सौ.ज्योती मडावी तथा ग्रामवासीय जनतेनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!