ती आणि तिच
यश कायरकर
खूप दिवसांनी म्हणजेच महिन्यांनी काल मला तिचा फोन आला . आणि पहिलाच प्रश्न 'कसा आहेस रे तू?' मी - 'मस्त , मजेत.' आमचा संवाद सुरू झाला , मात्र आज तिच्या बोलण्यात वेगळाच आनंद भासत होता. आज पहिल्यांदा ती स्वतःबद्दल बोलत होती. आम्ही नेहमी श एक-दोन महिन्यातून , अधून-मधून आठवण झाली की बोलतो, मुद्दाम मग ती शाळेत असो प्रवासात , की घरी . शिकवणीत असो की घर कामात. वेळ मिळाली की निवांत बोलणारच फोन का केला नाही म्हणून विचारणार नाही आणि कधी भेटण्याचा आग्रह ही नाही. फक्त आठवण झाली आणि वेळ मिळाला म्हणून मग निवांत बोलायचं .ती फक्त माझी मैत्रीणच नाही ती नेहमी योग्य मार्ग दाखविणारी माझ्या आयुष्यातली मार्गदर्शक आहे. माझी गुरु आहे आणि माझ्या काही चुका सांगितल्या की माझी कान ओढणारी मोठी बहीणही आहे . आम्ही खूपदा बोललो मात्र मला तिचा कालच बोलनच आठवणी त राहीलाय.
ती जेव्हा कधी बोलते तेव्हा त्यात ती नसायचीच. तिच्या बोलण्यात आई म्हणून तिच्या मुलांच्या भविष्याची चिंता, शिक्षिका म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांचे परिवार व त्यांची परिस्थिती याबद्दलची कळकळ, आणि मैत्रीण म्हणून तिच्या ग्रुपमधील मैत्रिणी आणि त्यांच्या परिवारातील तान तनाव यांच्या बद्दल मैत्रिणीच्या दुःखातील वेदना तिच्या बोलण्यात सतत असायच्या. या सार्यात अडकलेली ती मला नेहमी बोलण्यातून भेटायची. आणि मग 'यावर काय करता येऊ शकते रे ?' म्हणून मला थोपवीलेली प्रश्न. आणि नाही जमलं तरी त्यांना निस्तारन्याच्या प्रयत्नातून मी दिलेली तुटकी-फुटकी उत्तरे, आणि समाधान झाले म्हणून शेवटी ठरलेलं तिचं वाक्य- 'खूप बरं वाटलं रे तुझ्याशी बोलून आता रिलॅक्स झाली बघ. तू तर फोन करतच नाही, म्हणून फोन करून मीच त्रास देते, सॉरी!' यातही माझ्या बद्दल आदर, आभार, थोडी तक्रार आणि शेवटी खंत ही तीच व्यक्त करणार. पण कधी ती तिच्या बोलण्यात जास्त ती नसायचीच.
मात्र काल बोलताना फक्त तीच होती. पहिल्यांदाच मीच ऐकत होतो आणि ती बोलत होती . आणि बोलताना ती म्हणाली 'अरे तुला सांगू काय ? मी कोरोणा पॉझिटिव्ह होती' शब्द सहज बोलली ती मात्र मला खूप बोचले. राग तर आलाच मला मात्र नंतर लगेच विरून गेला. 'आता कशी आहेस तू? काय आहे आत्ता रिझल्ट? मला आधी का नाही नाही सांगितलं?'' मी प्रश्नांचा वर्षाव करीत होतो . ती माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत लगेच बोलली, 'खूप छान वाटते ते सहा-सात दिवस मी एकटीच होती दवाखान्यात खूप उसंत मिळाली मला. शासकीय असला तरी खूप छान दवाखाना आहे तो. सर्व व्यवस्था चहा-नाश्ता औषधी आणि औषधे घेतली खूप उष्णता शरीरांत असायची, सहा-सात दिवसात फक्त माझ्यासोबत मी होती खूप छान वाटलं मला.' आयुष्याच्या दगदगीतून तिने एकटीने घालविले हे सहा-सात दिवस खऱ्या अर्थाने तिचे होते असे तिच्या बोलण्यातून भासत होते . दवाखान्यात असतानाही तिने मला का फोन केला नाही याचे उत्तर मला मिळाले. त्यात तिला जगायचं होतं . आणि तेव्हा मलाही असेच वाटले एक-दोन दिवस तरी तिच्या सारखेच जगण्याचा मोह झाला. आणि 'मला होता येणार काय तुमच्या जिल्ह्यात दवाखान्यात भरती झालो जर कोविड पाॅझिटिव्ह तर?' ती कसलेही प्रश्न न करता म्हणाली ' नक्कीच जाशील छान व्यवस्था आहे तिथं' सहज बोलत राहिली आणि मला हसू आले. आणि तिने घालविलेले तिथे दवाखान्यातील 6-7 दिवसातील क्षण जगण्याचा मलाही मोह सुटला.
ती तिच्या पाॅझिटिव्ह होण्याबद्दल सांगताना म्हणाली 'मी पाॅझिटिव्ह येण्याआधी आम्ही होळीला खूप रंग खेळलो , मी मैत्रिणींना घेऊन पिकनिक अरेंज केली होती. खूप मजा केली मैत्रिणींना घेऊन पिकनिक केली रंग खेळली मात्र नंतर covid-19 positive निघानी म्हणून मैत्रिणींना, परिवाराला टेस्ट करायला सांगितले तर परिवारातून एकही पाॅझिटीव्ह नव्हता मात्र एका मैत्रिणीचा संपूर्ण परिवाराचे सदस्य कोविड पाॅझिटिव्ह निघाले' म्हणून ही दुःखी झाली कदाचित माझ्यामुळेच मैत्रीण व तिचा परिवार पाहिजे झाला असावा म्हणून खंत होती तिला. आणि खूप हळहळ व्यक्त करीत होती. मी मध्येच रागावलो 'तुझा परिवार नाही ना फक्त तिच्याच परिवार आहे ना, त्यांच्या मूळं तुला झाला असावा त्यामुळे तू नाहीच जिम्मेदार.' मुळीच हा विषय तिच्या आनंदात विरजण टाकल्यासारखा होता म्हणून मी मध्येच विषय संपवला.
नंतर ती त्या सहा सात-दिवसांत बद्दलच बोलत राहिली 'मी खूप आनंदी आहे रे. पहिल्यांदाच मला माझ्या आयुष्य जगायला मिळाला पहिल्यांदाच मी आणि फक्त मीच होती. बोलताना फक्त त्या सहा-सात दिवसात अडकून होती. तिला त्यातून बाहेर पडता येत नव्हतं की त्यातून बाहेर पडावेसे वाटत नव्हते कुणास माहीत . मात्र तिच्या आनंदात मी खूप रमून गेलो. आम्ही पण २५-३० वर्षापासून मित्र पण तिला आज ऐकतांना बरं वाटलं. खूप बोललो आम्ही मात्र सारं तीच बोलली. आणि मी ऐकतच होतो की काय असं झालं. आज कोणीच नव्हता आमच्या बोलण्यात मी सुद्धा नाही. ती आणि फक्त तीच होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!