लोहारा येथील आगग्रस्त वंदना खोब्रागडे याना आमदार बंटीभाऊ भांगडीया कडून आर्थिक मदत
श़ंकरपूर (जगदिश पेंदाम)
जवळ असलेल्या लोहारा येथे काल दि 7 एप्रिलला सकाळी 8 वाजता वंदना खोब्रागडे यांच्या झोपडीला अचानक आग लागून संपूर्ण झोपडी जळुन खाक झाली या आगीत खोब्रागडे यांचे खूप मोठे नुकसान झाले असून अन्न धान्य वस्त्र आणि सर्व जीवनावश्यक वस्तू जळुन खाक झाल्या त्यामुळे त्या बेघर होऊन त्यांच्या कुटूंबियांनवर आभाळ कोसळले आता कसे जीवन जगावे काय खावे कोणाला मागावे या विवंचनेत असताना लोहारा येथील कार्यकर्ते शैलेंद्र पाटील यांनी या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया याना या गंभीर बाबीची माहिती देताच आमदारांनी तात्काळ कार्यकर्त्यांच्या हस्ते आर्थिक मदत दिली
यावेळी मदत देत असताना भाजपचे तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे सरपंच सौ दीक्षा पाटील, रमेश कंचर्लावार आणि इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!