चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बेड ची संख्या वाढविण्याची मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कोलते
शंकरपूर(जगदिश पेंदाम)
राज्यात कोरोना चा फैलाव वाढला असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे ग्रामीण भागातील रुग्ण पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केले जात असताना त्या ठिकाणी बेड मिळत नसल्याने कोरोना रुग्ण मृत्यू होत आहे तेव्हा जिल्हा प्रशासनाने बेड संख्या वाढविण्याची मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रफुल कोलते यांनी केली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कोरोना वाढत आहे त्यात चिमूर तालुक्यातही कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे ग्रामीण भागातील रुग्णांना चंद्रपूर येथे बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे तेव्हा जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्ण बेड संख्या वाढविण्याची मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रफुल कोलते मांगलगाव यांनी केली आहे..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!