नेरी ग्रामपंचायतचे प्रहार वाहन चालक संघटनेकडून शतत आभार
प्रहार वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य (शाखा नेरी)
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आदरणीय जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच s.d.m साहेब चिमुर यांच्या आदेशानुसार नेरी ग्रामपंचायत नी नेरी व नेरी परीसरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवले आहे राज्य सरकारच्या आदेशानुसार वाहतूक मात्र चालू आहे पन वाहतूक चालू असतांना वाहतुकीसाठी लागनारी अत्यावश्यक स्पेअर पार्ट, मीस्री सेवा, पंचर दुकान, ही सगळी बंद केली होती याचा वाहन चालक मालकांना चांगलाच फटका बसला होता या सगळ्या गोष्टी चा आढावा घेऊन प्रहार वाहन चालक मालक संघटना (शाखा नेरी) व नेरी परीसरातील टीम थेट नेरी ग्रामपंचायत मध्ये निवेदन घेऊन धळकली आनी अट ठेवली की १ तर वाहतूक बंद करा नाहीतर वाहतुकीसाठी लागनारी अत्यावश्यक सेवा चालु ठेवा ताबडतोब नेरी ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रभान कामडी, ग्रामपंचायत सदस्य पिंटु भाऊ खाटीक, निखिल भाऊ पिसे यांनी त्वरित एसडीएम साहेब चिमुर यांना फोनद्वारे माहिती दिली वरील आदेशानुसार आमच्या मागनीला यश आले ताबडतोब नेरी शहरातील स्पेअर पार्ट, मीस्री सेवा, पंचर दुकान, सर्व त्र चालु झाले वाहन चालक मालकांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले आहे करीता प्रहार वाहन चालक मालक संघटनेकडून नेरी ग्रामपंचायत चे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!