बल्लारपूर बिजनेस असोसिएशनची मागणी : दररोज दुपारी 2:00 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मागणी
बल्लारपूर(वसंत मुन)
महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात 5 एप्रिल पासून ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लादण्यात आले होते मात्र निर्बंध लादून सुध्दा कोरोनाची रुग्णसंख्या वाढता आलेख पाहता 14 एप्रिल 2021 ला रात्री 8:00 वाजतापासून सम्पूर्ण महाराष्ट्रात धारा 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बल्लारपूर शहरात जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू आहे मात्र 15% दुकाने जी जीवनावश्यक कक्षेत मोडत नाही ती प्रशासनाद्वारे बंद पडली जात आहे मात्र याचा परिणाम असा दिसत आहे की, बाजारातील गर्दी कमी होण्याची चिन्ह दिसत नाही तसेच ज्या उद्देशाने राज्यात लॉकडाउन लावण्यात आला तो उद्देश मात्र सफल होत असताना दिसत नाही.
त्यामुळे बल्लारपूर बिजनेस असोसिएशन द्वारे प्रशासनाला विनंती करण्यात येते की, बल्लारपूर शहरात कमीत कमी 10 दिवसाचे लॉकडाउन वा जनता कर्फ्यु लावण्यात यावा आणि जी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने औषधी, किराणा, फळ, भाजीपाला, डेलिनीडस अशा प्रकारची दुकाने योग्य वेळी सुरू करण्याची परवानगी द्यावी यासाठी बल्लारपूर बिजनेस असोसिएशन नेहमी प्रशासनाला सहकार्य करेल मात्र उर्वरित 15% दुकाने बंद करून कोरोनाला आपण थांबवू शकता का ? याकरिता दररोज दुपारी 2:00 वाजेपर्यंत सर्व व्यापारी बांधवांना दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी ज्यामुळे व्यापारी बांधवांचे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच दुपारी 2:00 वाजेनंतर बल्लारपूर शहरात संपूर्ण लॉकडाउन करावे अशी मागणी बल्लारपूर बिजनेस असोसिएशनचे नरेश मुंदळा, भगवान दास गिडवानी,अर्जुनदास नाथांनी, अरुण वाघमारे, लियाकत अली, अब्दुल वसीम, लक्ष्मीकांत व्यवहारे, प्रशांत भोरे बवेजा ई उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!