२१ वी राज्य स्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धे मध्ये अवंती ने घेतली सुवर्णा पदकाची भरारी.

२१ वी राज्य स्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धे मध्ये अवंती ने घेतली  सुवर्णा पदकाची भरारी.

मूल ( अमित राऊत )
                 21वी राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशिप 2020-21 स्पर्धा  13 ते 14 फेब्रुवारी 2021 रोजी नागपूर येथील संत गाडगेबाबा हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 300 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.सदर राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे तसेच पी.जी.टी.टी डिपारमेंट नागपूर विद्यापीठ इथून एम.पी.एड करत आहे.
            सदर स्पर्धेत 18 वर्षा वरील वयोगटात कुमारी अवंती अनिल गांगरेडृडीवार ने सुवर्णपदक पटकाविले आहे.
          कुमारी अवंती अनिल गांगरेडृडीवार जयपूर येथे होणाऱ्या 21वी राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली असून सदर स्पर्धा 23 फरवरी ते 1 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक संदीप पेदापल्ली सर  तसेच आई-वडिल आणि प्रिन्सिपल डॉक्टर माधवी मार्डीकर यांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!