चांदापूर येथे विविध कार्यक्रम संपन्न, गाववासियांचा स्तुत्य उपक्रम

चांदापूर येथे विविध कार्यक्रम संपन्न, गाववासियांचा स्तुत्य उपक्रम


प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

   मुल तालुक्यातील चांदापूर येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 52 वा पुण्यस्मरण , सर्व संत स्मृती स्मरण आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्य शिवगर्जना सांस्कृतिक कला,क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ चांदापूरच्या सौजन्याने शिवजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावात लहान मुलांचे भजन,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्य गावात रॅली काढण्यात आली. सायंकाळी रक्तदान शिबिर घेण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा , इयत्ता ५ वी ते ७ वी अ गट आणि इयत्ता ८ वी ते १० वी ब गट करून विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.  


     विजेत्या स्पर्धकांचे रक्तदात्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मेडल देऊन गौरव करण्यात आला. सर्व सहभागी विध्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धांचे परिक्षक म्हणून मुख्याध्यापक सुनिता चल्लावार,रमेश डोंगरवार,नंदकिशोर शेरकी,विनोद कोहपरे, सुनिल निमगडे यांनी जबाबदारी पार पाडली. इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांचे पुस्तक वितरण करण्यात आले.   दिलीप पाल, खुशाल शेरकी, राजु पोटे, रवि शेरकी, विनोद कोहपरे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरदेव सेवा मंडळ चांदापूर, शिवगर्जना मंडळाचे सर्व सदस्य आदर्श बहुउद्देशीय मंडळ चांदापूर, संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व सर्व युवकांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!