सावरगाव ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा
सरपंच पदी रवींद्र निकुरे तर उपसरपंच पदी प्रवीण खोब्रागडे यांची निवड
तलोधी(बा.)
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामपंचायतच्या गुरुवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्पित ग्रामविकास आघाडीने झेंडा फडकविला असून सरपंच व उपसरपंच पदावर काँग्रेसनेच बाजी मारली.
सावरगाव ग्रामपंचायतच्या 11 सदस्यांच्या निवडणुकीत 7 जागांवर काँग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडीने विजयाची माळ खेचून आणली होती. तर केवळ 4 जागा भाजपकडे होत्या. आजपर्यन्तच्या इतिहासात सावरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षातच काट्याची लढत होत आली आहे. त्यामुळे अन्य पक्षाचा इथे टिकाव लागत नाही. इथे सरपंच पद हे ओबीसी स्त्री, पुरुष सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होते.दरम्यान गुरुवारी सरपंच व उपसरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत सरपंच पदाचा पुरुषाला मान मिळाला असून सरपंच पदी रवींद्र मेघशाम निकुरे यांची निवड करण्यात आली आणि उपसरपंच पदी प्रवीण पिसाराम खोब्रागडे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून मोरेश्वर येरणे यांनी काम पाहिले.सदस्यांमध्ये काँग्रेसचे युवराज ज्ञानेश्वर रामटेके,कविता लोकनाथ राऊत, सरिता नेत्रपाल खोब्रागडे, आशा रघुनाथ गेडाम,वंदना यशवंत सोनवाणे तर भाजपचे शिवशंकर कृष्णकुमार सहारे, जयंत प्रभाकर निकुरे, विमल दयाराम राऊत, यामिना मुकेश मुंगमोडे यांचा समावेश आहे. सरपंच पदाचे आरक्षण निर्धारित झाले तेव्हापासून विजयी काँग्रेसच्या गटात ओबीसीचे एकूण 3 उमेदवार दावेदार होते यात एक पुरुष व दोन महिला होत्या. तेव्हापासून सरपंचाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल. यासाठी सर्वांचे लक्ष वेधल्या गेले होते.आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषद काँग्रेस गटनेता डॉ. सतीश वारजुकर, प्रभाकर बोरकर, देविदास बोरकर,बळीराम राऊत, सुधाकर सहारे, यशवंत सोनवाणे, मोरेश्वर सेंदरे, मनोहर बोरकर, सुरेश सहारे, विजय ठीकरे, निकेश अलोणे, तुलोपचंद गेडाम, नारायण कोहरे, वनवास दूधकुरे, आदींची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!