वाढोणा ग्रामपंचायतवर भाजपा समर्थित काँग्रेसचे सरपंच तर भाजपचे उपसरपंच
तलोधी (बा.) (यश कायरकर)
नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील ग्रामपंचायतच्या गुरुवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा समर्थित
देवेंद्र गेडाम काँग्रेसच्या सरपंच पदी देवेंद्र गेडाम तर भाजपचा उपसरपंच पदी भाजपचे भगवान बन्सोड यांची निवड झाली. वाढोणा ग्रामपंचायत १३ सदस्यांच्या निवडणुकीत ४ भाजपचे तर काँग्रेसचे ३ तर अपक्ष १ यांच्या युतीतून काँग्रेसचे देवेंद्र गेडाम सरपंच पदी निवड झाली. तर उपसरपंच पदी भाजप चे भगवान बन्सोड यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्री तिवारी यांनी काम पाहिले. सदस्यांमध्ये वासुदेव मस्के ,मंगला बोरकर ,उषा पाटील ,रेश्मा सडमाके ,सरिता शेंडे, मीनाक्षी कोमावार ,प्रदीप येसनसुरे ,अनिल डोर्लीकर ,शोभा ठाकरे,रामेश्वर लांबेवार,प्रियांका गंजेवार यांचा समावेश आहे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!