मूल येथे सर्प जनजागृती कार्यक्रम संपन्न
मूल येथे सर्प जनजागृती कार्यक्रम संपन्न
मूल येथिल कर्मवीर महाविद्यालयातील अकरावी व बारावीतील विद्यार्थी - विद्यार्थीनीसाठी संजीवन पर्यावरण संस्था मुल तर्फे सर्प जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर द्वारे विषारी बिनवीषारी सापांची माहीती देण्यात आली व सापांविषयी असलेल्या गैरसमज दुर करण्यात आले. या माध्यमातुन विद्यार्थ्यांना मानवी जीवनात निसर्ग व पर्यावरणाचे महत्व पटवुन देन्यात आले.
या कार्यक्रमाला कर्मविर महाविद्यालयाचे प्राचार्य क-हाडे , प्राध्यापक दहीवले प्राध्यापक शेलेकर, प्राध्यापक बोधे व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे, स्वप्नील आक्केवार, अंकुश वानी, प्रतीक लेनगुरे, संकल्प गणवीर, जय मोहुर्ले, यश मोहुर्ले, अनुराग मोहुर्ले, रीतेश पीजदुरकर व हर्षल वाकडे उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!