बायो एफ जैविक शेती, फायदेशिर शेती : शेतकऱ्यांचा सूर.

बायो एफ जैविक शेती, फायदेशिर शेती : शेतकऱ्यांचा सूर.

 शेतकरी विकास जागृती कार्यक्रम संपन्न. 

 प्रत्यक्ष शेतातील कार्यक्रमात : अनुभवी प्रयोगशिल शेतकऱ्यांचे मनोगत. 

चंद्रपूर (प्रति)

 ११ फेब्रुवारी २०२१.रोजी
मारडा (मोठा) त.जि. चंद्रपूर येथे प्रत्यक्ष प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या निसर्गरम्य परिसरात प्रत्यक्ष शेतात ज्ञानप्रकाश लोकसंस्था, सत्यक्रांती बायो अॅग्रो व्हिजन प्रा.लि. व हरितक्रांती बायो अॅग्रोटेक द्वारा नुकताच *" शेतकरी विकास जागृती कार्यक्रम.,,* यशस्वीरित्या संपन्न झाला. 




कार्यक्रमात रासायनिक शेतीचे,पर्यावरण, मानवी आरोग्य व शेतकऱ्यांच्या कौंटूबिक आर्थिक स्थितीवर होणारे भयंकर दुष्परीणाम त्याचप्रमाणे या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी बायो एफ जैविक शेतीशिवाय प्रभावी व परिणामकारक पर्याय नसल्याचे मत प्रमुख मार्गदर्शकांनी आवर्जून मांडले. शेती सोबत पूरक जोड व्यवसाय करण्यावरही विशेष भर देण्यात आले.

 या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे चंद्रपूर जिल्हयातील मूल, पोंभूर्णा,चंद्रपूर,कोरपना आणि जिवती तालुक्यातील जैविक शेती करून नवा आदर्श सर्वांसमोर मांडणाऱ्या शेतकऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात श्रीमती पार्वताबाई माकोडे यांच्या अभिनव प्रयोगासाठी विशेष सत्कार करण्यात आला. 

"मुख्य म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या  खर्चात बचत, उत्पन्नात झालेली वाढ व सोबतच कडक बनत चाललेल्या जमीनीत आलेला भुसभुसीतपणा या शेतकऱ्यांनी मांडलेल्या मनोगतामुळे कार्यक्रम अधिकच प्रभावी व परिणामकारक झाला हे विशेष." 

मनोगत मांडणाऱ्या अनुभवी शेतकऱ्यांत श्री. सुनिल चलाख,श्री. रामचंद्र वासेकर,मूल,श्री. नंदाजी बुरांडे,श्रीहरी पाटील बुरांडे, श्री. दिलीप बुरांडे, पोंभूर्णा, श्री. दशरथ पहानपट्टे,चंद्रपूर, आणि जिवती तालुक्यातील श्री. चंद्रकांत राठोड यांचा समावेश होता.

 कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व संयोजक श्री. राजेंद्र पिंपळकर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्रीपतभाऊ राठोड, नागपूर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. माधवराव थेरे (माजी सरपंच,मारडा), शकुंतलाबाई पिंपळशेंडे, श्री.श्रावण माकोडे (गुरुजी),श्री.प्रफुल माकोडे,चंद्रपूर, श्री. गुलाब राठोड,श्री.शंकर पिंपळशेंडे, अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे श्री.मंगेश ठोंबरे, सत्यक्रांतीच्या जयश्रीताई राठोड होते. 

श्री. ठोंबरे यांनी कार्यक्रमात माती परिक्षणाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. अर्चनाताई पिंपळकर यांना केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री. मनिष माकोडे,श्री.अनिल काटे, श्री. मिलिंद धवने, श्री. संतोष वाघमारे, श्री. राजू तलांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!