मूल नगर परिषद व वॉर्डवासियांतर्फे स्वच्छता अभियान

मूल नगर परिषद व वॉर्डवासियांतर्फे स्वच्छता अभियान 

मूल प्रतिनिधी 

 रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे औचित्य साधून शहरातील  वॉर्ड क्र. 17
मध्ये  मूल नगरपरिषद अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
      सदर वॉर्ड हा मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता,  नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे,  स्थानिक नगरसेवक मिलिंद खोब्रागडे,  प्रभाताई चौथाले, मनीषा गांडलेवार यांच्या पुढाकारातून वॉर्ड नं.17 मध्ये जातीने लक्ष देऊन विविध रोड, नाल्या पूर्णत्वास आनल्या आहेत. 
         विविध विकासात्मक काम पूर्णत्वास आल्याने उत्साहात स्थानिक नागरिकांनी मुल नगर परिषद सोबत सहभाग घेऊन प्रभागात स्वच्छता अभियान राबविले. 
          सदर उपक्रमात  सभापती प्रशांत समर्थ, किशोर कापगते, राकेश ठाकरे, ऍड. बल्लू नागोसे, नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
       कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी विजेंद्र साखरे, संदीप इटकरवार, प्रकाश गौर, किशोर रामटेके, शंकर कामडी, गणेश चव्हाण, गोकुल दियासी, आकाश मोटघरे, नितेश धुळेपाकेवार, रवी मोटघरे, करण वनकर,  सुमनबाई कामडी, चौहान तसेच वार्डातील अनेक युवक, महिलांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!