मुल येथे व्हिडिओग्रॉफी कार्यशाळा

मुल येथे व्हिडिओग्रॉफी कार्यशाळा



   मूल (सचिन वाकडे)             

छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तसेच मुल तालुका छायाचित्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मा. सा. कन्नमवार सभागृह, प्रशासकीय भवन जवळ मुल येथे शुक्रवार १९ फेब्रुवारीला एकदिवसीय व्हिडिओग्रॉफी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक सुप्रसिध्द व्हिडिओग्रॉफी मेंटर रामकृष्ण सुर्वे नांदेड, फोटोग्रॉफी मेंटर नितीन मेश्रामकर अमरावती यांनी उपस्थित छायाचित्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत डिएसएलआर वेडिंग हायलाईट्ससाठी टिप्स, व्हिडिओ कॅमेरा बेसिक, विवाह प्रसंगातील महत्वाचे बारकावे, हायलाईट टिझरसाठी शुट, वेडिंग स्टोरी एक नवीन संकल्पना, व्हिडिओ एडीटसाठी शुटची पुर्व तयारी, व्हिडिओ कॅमेरातील महत्वाचे बारकावे, कलर करेक्शन, प्रिसेट, कॅमेरा इफेक्ट, प्रॅक्टिकल शुट सहज व सोप्या भाषेत व्यवसायासमंधित प्रश्नोत्तरे यासारखे अनेक विषय हाताळण्यात आले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव फुलचंद मेश्राम, संचालन वासू तर आभार संस्थेचे अध्यक्ष नितीन रायपुरे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रुपेश कोठारे, सचिन वाकडे, अनिकेत बुग्गावार, श्रीकांत देवगडे, महेश भुरसे, प्रविण चलाख, ओमकार माडेकर, आकाश निमगडे, लखन भोयर, प्रवीण गभने, आशिष मुत्यलवार, विकास चलाख, प्रमोद चुदरी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!