जांभुळघाट येथील तेली समाज सभागृहाचे भूमिपूजन संपन्न
शंकरपूर (जगदिश पेंदाम)
परिसरातील जांभूळघाट येथील तेली समाजसभागृहाचे भूमिपूजन भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले..
यावेळी राजू बानकर भिसी, राजेंद्र साठोने उपसरपंच, रामेश्वर सावसाकडे यांची उपस्थिती होती .
समाजसभागृह बांधकाम साठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आर्थिक मदत दिली असल्याने जांभूळघाट तेली समाजाच्या वतीने तेली समाज बांधवानी आमदार बंटीभाऊ भांगडीया याचे अभिनंदन केले.
यावेळी भूमी पूजन सोहळ्या ला समाजाचे अध्यक्ष अविनाश तरारे, राजू, भजबुजे, प्रकाश तरारे श्रीराम तरारे, शंकर देव्हारे, झितुजि ठाकरे, रामचंद्र देव्हारे खुशाल ठाकरे व सर्व समाजबांधव उपस्थितीत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!