सावधान ! मूलचे प्रशासन ऍक्शन मोड मध्ये
सावधान ! मूलचे प्रशासन ऍक्शन मोड मध्ये
मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई
मूल - (अमित राऊत)
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर 500 रुपयांचा दंड आकारण्याचेही निर्देश राज्यसरकारने दिले आहेत. टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा वावर मर्यादित होता. पण टाळेबंदी संपल्यानंतर गर्दीचे प्रमाण वाढले. ही परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून सुरक्षित अंतर राखण्यासह मास्कच्या वापरासाठी जनजागृती केली जात आहे. असे असले तरी मूल मध्ये मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई आणखी तीव्र केली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यंत प्रभावी ठरत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी मास्क वापरावा, हा कारवाईमागील उद्देश आहे. नागरिकांनी स्वतः स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, सोशल डिस्टन्स पाळावे, शहरात आर टी पी सी आर, अँटीजेन तपासणी ची सोय आहे ते नागरिकांनी करावे,कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास किंवा आपण कोणाच्या संपर्कात आल्यास तातडीने स्वतःची तपासणी करून आपल्या कुटुंबाची, समाजाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन नागरिकांना मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी सर्च टीव्हीशी बोलताना केली. ही कारवाई तालुका प्रशासनाकडून मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रवींद्र होळी, मूल नगर पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीशसिहं राजपूत, कर्मचारी तसेच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याकडून केलेली आहे.



500रु चा दंड घेन्यापेक्षा 50 रु चे मास्क दिले तर ते सर्वसामान्याच्या हिताचे होईल।एखादी व्यक्ती सांगूनही वारंवार चुका करत असेल तर दंड घेणे ठीक आहे।
उत्तर द्याहटवा