बोडधा ग्रामपंचायत वर भाकप चा झेंडा

बोडधा ग्रामपंचायत वर भाकप चा झेंडा,
सरपंचपदी मनीषा झोडगे तर उपसरपंच विरोधी गटाचे दिपक ठाकरे यांची निवड.


ब्रम्हपुरी (सुरज सुर्यवंशी)
17 फेब्रुवारीला बोडधा येथील ग्रा. प.सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सरपंच म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मनीषा राजेंद्र झोडगे तर उपसरपंच पदी विरोधी गटाचे दिपक ठाकरे यांची ईश्वर चिट्टी द्वारे निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाकप चे  5 तर काँग्रेस चे 2 उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात अविरोध निवडून आले होते.परंतु सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी गटाने झोडगे पॅनल चे दोन उमेदवार पदाची लालुच दाखवून पळवून नेले होते.त्यामुळे गावामध्ये अत्यंत तंग वातावरण निर्माण झाले होते.शेवटी पळवून नेले ला  एक उमेदवार गैरहजर राहिल्याने दोन्ही गटाकडे तीन तीन उमेदवार सम समान झाले त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वर  चिट्टी द्वारे सरपंच म्हणून भाकप ची मनीषा राजेंद्र झोडगे तर उपसरपंच पदी विरोधी गटाचे दिपक ठाकरे यांची निवड जाहीर केली. शेवटी सत्याचा विजय होत झोडगे गटाचा वर्चस्व कायम राहून विरोधी गटाचा डाव उधळला गेला .
निवडणूक यशस्वी करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे,देवराव चवले,संजय वाकडे,विनोद राऊत ,धनराज ठाकरे, माजी सरपंच शरद ठाकरे,प्रकाश दरडमारे,घनश्याम खोब्रागडे, तानबा कोटगले ,अनिल हनवते,जयदेव हुलके, डाकराम ठाकरे ,गजानन ठाकरे सह अनेक गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
दि.18/2/2021

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!