अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ब्रम्हपुरी मार्फत "महाविद्यालये उघडा आंदोलन"

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - कोविड१९ च्या परिस्थिती मुळे गेल्या ११ महिन्यांपासून  राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. कोविडच्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात सुधार आले असून राज्य  सरकारद्वारे दारूची दुकाने, मॉल, सिनेमागृहे व परिवहन सेवा तसेच राज्यातील पहिली ते पाचवी व नववी ते बारावी च्या शाळा सुरु करण्यात आल्या मग महाविद्यालयेच बंद का ? असा प्रश्न विद्यार्थी परिषद राज्य सरकार ला विचारत आहे?  महाविद्यालय  बंद  असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करण्यात येत आहे. परंतु त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे होताना दिसत आहे. ऑनलाइन पद्धतीचा वापर करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. राज्यातील सर्व महाविद्यालये त्वरित उघडण्यात यावी या  मागणीला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे मार्फत २ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात प्रत्येक तालुका स्तरावर, जिल्हास्तरावर व महाविद्यालीन स्तरावर  "महाविद्यालय उघडा  आंदोलन"  करण्यात आले दरम्यान ब्रम्हपुरी तालुक्यातील स्थानिक नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय च्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे  स्वता:च्या हक्कासाठी व शिक्षणाविषयी निद्रिस्त असलेल्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आले व नेवजाबाई हितकारणी  महाविद्यालयाचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामध्ये अभाविप ब्रम्हपुरीचे नगरमंत्री  संदेश उरकुडे , नगरसहमंत्री तुषार राऊत , जयंत दलाल , महाविद्यालय प्रमुख अनुप पिपरे , विद्यार्थिनी प्रमूख ईशा भाई , विद्यार्थिनी सहप्रमुख खुशी चीलमुलवार ,एस एफ एस प्रमूख रविना ठेंगरे , सिमरन मोहूरकर,साक्षी पाटकर, युगांत निखुरे ,देवेंद्र तोंडरे, अमर राऊत,  विकास मडावी , अभिजित मडावी , सुजल बार्सागडे, निखिल भूपाल , प्रज्योत मूळे, मयूर नगमोती, शुभम राऊत, केतन खोबे, व  अखील भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरीचे कार्यकर्ते व महाविद्यालयीन विद्यार्थी  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!