मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - सुधीर मुनगंटीवार यांचे बंदद्वार चर्चा


संग्रहित छायाचित्र

मुंबई (पब्लिक मिडिया)
शिवसेना काही आमच्या अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही. असे सूचक विधान करीत भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय बाॅम्ब गोळा टाकला आहे. आज मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बराच काळ बंदद्वार चर्चा केली. बाहेर आल्यानंतर ही प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भाजप शिवसेनेचे पुढे काय होते हे बघू असेही, त्यांनी यावेळी विधान केले.
मुनगंटीवार यांच्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शिवसेना भाजपात काही शिजत आहे काय? याचे तर्कवितर्क लावल्या जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामाचे संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील विमानतळाबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!