नेरी सिरपुर क्षेत्रात कर वसुली पथक दाखल थकितकरदात्यांना कर भरण्याचे आव्हान
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर तालुक्यातील नेरी सिरपुर क्षेत्रात कर वसुली पथक दाखल झाले असून मालमत्ता कर व पाणीपट्टी कर नागरिकाकडून वसूल करण्यात येत असून मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा वित्तीय वर्ष २०२० - २०२१ मधील थकीत असल्याने मार्च महिन्यात शंभर टक्के कराचा भरणा करणे आवश्यक आहे.मालमत्ता कर व पाणीपट्टी कर आजूनपावोतो नागरिकांनी भरणा न केल्याने संजय पुरी गटविकास अधिकारीयांच्या मार्गदर्शनाखाली व गुंतीवार विस्तार अधिकारी पंचायत समिती चिमूर यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथक तयार करून थकीत असलेल्या करदात्यावर कर भरण्या करिता घरो घरी जाहुन नियमित कराचा भरणा करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.आतापर्यंत बोळधा सिरपुर खुंटाळा सावरगाव येथे दाखल झाले असून आज दि 25 ला बोथली येथे कर वसुली सुरू आहे.
सद्या स्थितीत बोथली गट ग्राम पंचायत अंतर्गत .उर्वरित कर वसुली लवकरच करण्यात येईल.असे बोथली ग्राम पंचायत चे सचिव हरिहर ढोले यांनी सांगितले.ग्राम पंचायतचा मालमत्ता चालू व थकीत पाणीपट्टी कर वेळेवर व नियमित भरणा करावा कर वसुली न भरल्यास जप्ती ची कारवाई करण्यात येईल वसुली पथक येण्या अगोदर उर्वरित गावातील गावकऱ्यांनी कर भरून सहकार्य करावे असे आवाहन वसुली पथकाने केले आहे या वसुली पथकामध्ये मंजुषा ढोरे मॅडम सचिव खुंटाळा विट्टल नखाते सचिव कळमगाव समर्थ उराडे सावरगाव लोकचंद भासास्कर सचिव सिरपुर हरिहर ढोले सचिव बोथली कवडू तरारे सचिव नवतला राकेश गजभे सचिव लोहारा एकनाथ गहाणे प स चिमूर इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे बोथली येथे वसुली करताना या पथका सोबत मनोहर चौधरी सरपंच बलराम नागपुरे ग्राम पंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!