चिचपल्ली स्थित बांबू प्रशिक्षण केंद्र जळून खाक : आज दूरपारची घटना
चिचपल्ली स्थित बांबू प्रशिक्षण केंद्र जळून खाक : आज दूरपारची घटना
मूल (अमित राऊत)
चंद्रपुर-मुल मार्गावर असलेल्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. शार्टसर्किटने आग लागल्याची चर्चा होत असली तरी ही आग नेमक कशाने लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे बांबू केंद्राचे खूप मोठे नुकसान झाले असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे. आग लागल्याची माहिती होताच मूल वरूनआणि चंद्रपूर वरून अग्निशमन दलाची गाडी आग विझविण्याकरिता गेली.मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात लागली होती.
विदर्भातील जंगलात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूवर आधारित उद्योगांच्या स्थापनेसाठी आदिवासी, ग्रामीण बांधवांना असलेली प्रशिक्षणाची निकड भागविण्याकरिता या केंद्राची स्थापना करण्यात आली होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!