डाॅक्टर आणि परिचारीकांच्या वादात भिसी रूग्णालय डाॅक्टकडून भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल परीचारीकांची अरेरावी ठरली रूग्नांसाठी डोकेदुखी
शंकरपूर (जगदिश पेंदाम)
अप्पर तालुका भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ फेब्रुवारीला डाक्टर आणि परिचारीकामध्ये रूग्णाची बि. पि . तपासण्यावरून डाक्टर व परिचारीकामध्ये शाब्दिक वाद झाला.पाहता पाहता शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने भिसी प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
प्राप्त माहितीनुसार कन्हाळगांव येथील सुमन ठाकरे या भिसी प्रा. आरोग्य केंद्रात बि. पि. तपासणी साठी आली असता ,डा.प्रियंका कष्टी यांनी बरवे परिचारीकाकडे तपासणी करीता पाठविले. तेव्हा बरवे यांनी सदर रूग्णाला बि.पि. तपासण्याचे काम डाक्टरचे असल्याने परत डाक्टरकडे पाठविले.त्यामुळे डाक्टर कष्टी यांनी परीचारीका यांना विचारना केली असता रूग्णांसमोर शाब्दिक वादाला सुरुवात झाली. त्यां नंतर डॉ.प्रियंका कष्टी यांनी वंदना बरवे, व आरती भटेले या दोन मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या परिचारीकांना आपल्या कार्यालयात बोलावून डॉ क्ष्रिकांत काळे, व डॉ . कष्टी यांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप परिचारीकांनी केलेला आहे.
यासंबंधी सदर प्रतिनिधीने डॉ, कष्टि यांचेशी संपर्क केला असता सुमन ठाकरे या रूग्णाची बिपी तपासणी करण्याचे सांगीतले असता बर्वे परीचारिका यांनी बिपी तपासनी करण्याचे नाकारले. मि त्यांना कारण विचारले असता त्यांनी रूग्णांसमोरच अरेरावीची भाषा बोलण्यास सुरवात केली. नंतर त्यांना आपल्या कॅबीन मध्ये बोलावून समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मला व माझे सहकारी डॉ. श्रीकांत काळे यांना अरेरावीचा भाषा वापरून बघून घेण्याची धमकी दिली. नंतर आम्ही वरीष्ठ अधीकाऱ्यांशी चर्चा करून बर्वे व भटेले या दोन्ही परीचारीकांना शोकाज नोटीस देण्यासंबंधी चर्चा करीत असतांना दोन्ही परीचारीका परत आमच्या कॅबीन समोर आल्या व स्वतःच्या अंगावर स्पिरीट ओतून आत्महत्येची धमकी दिली. परत आम्ही वरीष्टांच्या आदेशानुसार भिसी पोलीसांना सुचना देवून प्राथमीक आरोग्य केन्द्रात बोलावून घेतले. या आधी सुध्दा या दोन्ही परीचारीकांविरूध्द रूग्णांनी अनेकदा तक्रारी ( तोंडी ) केल्या. परंतु त्या वेळी त्यांना समज देण्यात आली होती.तसेच त्यांनी लावलेल मारहानीचे आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगीतले.
या संदर्भात भिसी प्राथमीक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधीकारी डॉ. प्रियंका कष्टी व डॉ. श्रीकांत काळे यांनी दोन्ही परीचारीकांविरोधात भिसी पोलीसात तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केल्याचे भिसीचे थानेदार मनोज गभने यांनी सांगीतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!