श्रीगणे.शजयंती नीमीत्त
श्रीगणे.शजयंती नीमीत्त
वक्रतुंड महाकाय,सुर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरुमे देव, सर्वकार्येषु सुसर्वदा :::
ज्या देवतेमध्ये कोटी सुर्याए्वढी शक्ती आहे अशा श्रीगणेशाला माझा नमस्कार .
श्री गणेश हा लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची देवता,येत्या १५ फेब्रुवारीला श्रीगणेशजयंती आहे.
ज्यादिवशी गणेशलहरी प्रथम पृथ्वीवर आल्या,म्हणजेच त्या दिवशी गणेश जन्म झाला ,तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी.
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीपुजनानेच केल्या जाते.गणपतीचे अनेक अवतार पृथ्वीतलावर झालीत आणि प्रत्येक अवतारात त्यांनी राक्षसांचा वध केला.
गणपतीला अनेक नावे आहेत ,जसे वक्रतुंड, भालचंद्र , मंगलमूर्ती, विनायक , चिंतामणी,वीद्यापती . त्या तो विद्येची देवता आहे.गणपतीला पुजेत लाल फुल ,दुर्वा वाहतात. दुर्वा ३,५, ७ या अंकात वहावी त्या कोवळ्या असाव्यात.
श्री गणेशाने आई-वडिलांना प्रदिक्षणा मारुन पृथ्वीप्रदक्षीणा मारण्याची स्पर्धा जिंकली आणि तेव्हा पासुन श्री गणेशाने आपल्या कृतीतून मनुष्यजीवनात आई-वडिलांचे महत्त्व पटवून दिले आणि तेव्हापासूनच गणपतीला प्रथमपुजेचा पण मान मिळाला. गणपती विद्येची देवता असल्याने विद्यार्थ्यांनी जर गणपतीची उपासना केली आणी अभ्यासाच्या कृतीची सांगड घातली तर ते परिक्षेत नक्की च यशस्वी होतील.
विद्यार्थ्यांनी रोज श्रीगणपतीचा
"ॐ गं गणपतये नम:' हा जप जास्तीत जास्त करावा.
गणपतीला मोदक फार आवडतात. त्यांचे वाहन उंदीर आहे.महाराष्ट्रातील अष्टविनायक प्रसीद्ध आहे.' मंगलमूर्ती मोरया 'हे नाव गणपतीला मोरया गोसावी या त्याच्या एका भक्ताच्या नावावरून पडले.यावरून देव आणि भक्त यांचे अतुट नाते लक्षात येते.
गणेशोत्सवात गणेशभक्त गणपतीचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. पण आजकाल गणेशोत्सवात भक्तीपेक्षा वीडंबन चाललेले दिसुन येते,जसे नीरनीराळ्या वस्तुंपासुन गणपती बनवीणे,सीनेमाची गाणी लावणे,वीसर्जन करताना मद्यपान करुन डी.जे .वर नाचणे.अशाने आपल्याला श्री गणेशाचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल का?त्यातच भर म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन वाले गणपती शिरवण्यासाठी विरोध करतात व मुर्ती दान करायला सांगतात.कृत्रीम तयार केलेल्या टाकीत गणपती शीरवायला सांगतात आणि आपल्याला धर्मशास्त्र माहित नसल्यामुळे आपण त्यांनी सांगीतल्याप्रमाणे कृती करतो.खरे तर गणपतीला वहात्या पाण्यातच शीरवले पाहिजे कारण दहा दिवस आपण पुजा करुन जी सात्वीकता मुर्ती मध्ये आलेली असते. ती पाण्याच्या माध्यमातून सर्वांना वर्षभर मिळते.ज्या ज्या शेतातुन पाणी वहात जाते त्या त्या शेतातील धान्यात सात्वीकता निर्माण होऊन सात्वीक. धान्य सर्वांना मिळुन मनुष्याची वृत्ती सात्विक बनेल.आज या गोष्टी ची खरी गरज आहे. म्हणुनच आजपासूनच गणेशोत्सवात होणारे वीडंबन रोखुन श्री गणेशाचे कृपाशीर्वाद प्राप्त करू या.
||गणपती बाप्पा मोरया. ||
सौ.भारती कोंतमवार,मुल


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!