ट्राईब ,( गोंड ) समाजातील सर्व जमातींनी शालेय, नौकरी, तथा जनगणनेत "गोंडी" धर्माची नोंद करावी:
मनोजसिंह गोंड मडावी मुर्सेनाल जा गो.स.मा चांदागढ यांचे प्रतिपादन
मदनापूर ता. चिमूर गोंडी कोया पुनेम सम्मेलन तथा सल्ला-गांगरा प्रतिमेचे उद्घाटन
चिमूर : - पुनेम गोंडी धर्माची स्थापना मुठवापोय पहांदी पारी कुपार लिंगो ( धर्म गुरू ) यांनी केली असून अनादी काळा पासून या धर्माचे , पुनेम चे पालन गोंड जमाती चे गण , सर्व tribe लोक पालन करीत आहेत.
गोंडी धर्म निसर्गाच्या व विज्ञानाच्या तत्त्वाशी जुळलेला आहे. त्यामुळे गोंडी धर्माचे समाज बांधव , tribe ज्या भागात ज्या प्रदेशात वास्तव्यास आहेत त्या भागातील लोक गोंडी धर्म , पुनेम , सभ्यता , रिवाज , परंपरा , नृत्य , खान पान, मोठ्या आदराने आणी अभिमानाने मानतात पाळतात म्हणून त्या भागातील जल , जंगल , जमिन , परंपरा अजूनही सुरक्षित आहे. आपली अनोखी परंपरा , नृत्य , सभ्यता , रिवाज जिवंत ठेवण्या करिता शासनाने दिलेल्या जनगणनेतील धर्मा च्या रकान्यामधे " गोंडीधर्म " अशी नोंद करावी असे आवाहन जागतिक गोंड सगा मांदी चे व tribe समाजाचे अभ्यासक , वक्ते मनोजसिंह गोंड मडावी यांनी केले आहे.
चिमूर तालुक्यातील मदनापुर येथे जागतिक गोंड सगा मांदी शाखा मदनापूच्या वतीने सल्लां गांगरा प्रतिकृतिचे उद्घाटन तथा गोंडी कोया पुनेम सम्मेलनाचे आयोजन दिनांक 14 फरवरी 2021रोज रविवार ला करण्यात आले होते. या प्रसंगी ते उद्घाटक व मार्गदर्शक या भुमिकेतून बोलत होते. ध्वजारोहन कार्यक्रमाचे अध्यक्ष परशुराम आत्राम मदनापूर , यांचे हस्ते करण्यात आले . प्रमुख मार्ग दर्शक म्हणून तिरूमाय - प्रा. अर्चना खंडाते गोंडी पुनेम प्रचारक तथा नगरसेविका ब्रम्हपुरी, तिरू . खिरदासजी चिकराम अध्यक्ष वि. बा. शे. बहू उ. संस्था बेला , प्रा. विजय कुमार खंडाते पुनेम प्रचारक ब्रम्हपुरी तिरू. नानाजी उईके उप सरपंच ग्रा. पं. जा गो स मा जामनी, तिरू. लक्ष्मण गोंड मडावी जा गो स मा चिमूर, दिपक गोंड कुमरे भुमका जा गो स मा चिमूर, तिरू. छत्रपाल मसराम जा गो स मा पळसगांव , इंदरशहा मडावी जा गो स मा जामनी,
मदनापूर , गजानन कंगाले सचिव जा गो स मा, मदनापूर , शेखर आत्राम युवा अध्यक्ष जा गो स मा चिमूर तालुका शोभा कोयचाडे , मा. सरपंच कोलारा , सुनिता सिडाम अध्यक्ष जागोसमा महिला, आशा आत्राम सचिव जागोसमा महिला उपस्थित होते .त्या पुर्वी गावातून मिरवणूक काढण्यात आली गोंड समाजाच्या पेन पुर्ख्यांना , विर , शहिद वीरांना हार अर्पण करण्यात आले व शहिद बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
प्रस्तावना - प्रदीप घोडाम अध्यक्ष जा गो स मा मदनापूर सुत्रसंचालन - दिलिपसिंह गोंड वटे जा गो स मा चिमूर
आभार प्रदर्शन- कुळमेथे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुरज वेटे , वैशाली कुळमेथे , बेबी आत्राम, कैलास कुळमेथे , हिवराज सिडाम , माधुरी कंगाले व मदनापूर चे सर्व गोंड समाज आदिंनी परिश्रम घेतले .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!