मूल शहरात शिवजयंती शांततेत संपन्न
मूल शहरात शिवजयंती शांततेत संपन्न
19 फेब्रुवारीला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्याचप्रमाणे मुल शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंती साजरी करण्यात आली. या वर्षी मात्र कोरोणाचे सावट असल्याने आणि गर्दी करायची नसल्याने शांततेत साजरी करण्यात आली.
शहरात शिवशाही मित्र परीवाराने दरवर्शी प्रमाणे आयोजन केले होते. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना मास्कचे आणि फळे,बिस्कीटे वाटप करण्यात आले. सायकांळी शहराच्या मुख्यठिकाण असलेल्या गांधी चौक येथे छत्रपती शिवाजी महारारांच्या मुर्ती समोर हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. अश्या साध्या पद्धतीने यावर्षी जयंती साजरी करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!