ग्रामविकास आघाडी शिवउत्सव समिती चिचाळातर्फे छ. शिवाजी महाराज जयंती साजरी.


शिवजयंती उत्साहात साजरी.


मूल (प्रकाश चलाख)




मुल तालुक्यातील ग्राम चिचाळा येथे राज्यसरकरच्या निर्देशाचे पालन करीत सार्वजनिक शिवजयंतीचा कार्यक्रम ग्रामविकास आघाडी शिवउत्सव समिती चिचाळातर्फे छ. शिवाजी महाराज मुख्य चौक चिचाळा येथे साध्या पद्धतीने घेण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या प्रथम नागरीक सौ. जस्मिताताई दशरथ लेनगुरे सरपंच ग्रामपंचायत चिचाळ ह्या होत्या. सर्वप्रथम छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलित सौ. सोनी लक्ष्मण लेनगुरे ग्रा.प. सदस्या यांच्या शुभहस्थे तथा गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

यावेळी ग्रा. प. चिचाळा चे सदस्य/ सदस्या सौ वर्षा संजय लेनगुरे, सौ गीता रुपेश कोठारे, सौ सपना राजेंद्र दुधबळे, सौ रेखा प्रभाकर निकेसर, श्री सौराज सुरेश ईटकलवार, श्री दीपक मुर्लीधर मेश्राम, श्री अतुल सोमा निकोडे, श्री प्रशांत रामचंद्र गट्टूवार, श्री दुर्गे पोलिस पाटील, श्री कवडुजी बोबाटे अध्यक्ष तं. मु. गाव समिती, श्री राजू सोमनकार अध्यक्ष शाळा व्य. समिती तथा गावातील प्रमुख जेष्ठ मंडळी, महिला भगिनी उपस्थित होते.

 प्रमुख मान्यवरांच्या हस्थे गावातील युवक सुरज रमेश चलाख याची सीआरपीएफ मध्ये निवड झाल्याबद्दल गुलाबपुष्प व भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले, सोबतच इ. 10 वी, 12 वी च्या वार्षिक परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले त्यात हिना सोनूले, कुणाल लेनगुरे, समीक्षा दहिवले, आदर्श लेनगुरे, समृद्धी निमगडे, राहुल धोडरे, छगन बुरांडे सोबतच उत्कृष्ट भाषण दिल्याबद्दल आर्यन लेनगुरे व प्रणय लेनगुरे या दोघाही बंधूंना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 

अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज चलाख उपसरपंच ग्रा. पं. चिचाळा, संचालन सौरभ निमगडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!