बंटीभाऊ भांगडीया आमदार यांचे नेतृत्वात नागभीड येथे उप कार्यकारी अभियंता महावितरण विभाग नागभीड यांचे निषेधार्थ भाजपा तालुका नागभीड तर्फे हल्‍ला बोल व ताला ठोको आंदोलन संपन्न...



(चिमूर तालुका प्रतिनिधी) 
 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील जनता हतबल झालेली आहे.अनेक दिवस गरीब जनता ही कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त होती त्यामुळे हातचे काम गेल्याने गरीब जनतेसमोर फार मोठे संकट आलेलं होते.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने काम करून जनता आपल्या पोटाची भूक भागवत आहे.
अशातच महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना कनेक्‍शन तोडण्‍याची नोटीस पाठवुन राज्‍यातील जनतेला अंधारात टाकण्‍याचे पाप केले आहे.राज्‍यातील संवेदनाहीन महाभकास आघाडीने नागरिकांचा छळ चालविला आहे. लॉकडाऊनच्‍या काळात गरिब जनतेला अवाजवी रकमेची बिले पाठवुन आता त्‍यांचे कनेक्‍शन कापण्‍याचा पाप राज्‍य सरकारने केलेला आहे.म्हणून यांचे निषेधार्थ बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांचे नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तालुका नागभीड तर्फे आज दिनांक 05/02/2021 रोजी उप कार्यकारी अभियंता महावितरण विभाग नागभीड येथे महावितरण कंपनीच्‍या विरोधात हल्‍ला बोल व ताला ठोक आंदोलन पुकारण्यात आले. व संबंधित अधिकारी यांना विद्युत बिल माफ करण्याविषयक निवेदन देण्यात आले. 
या आंदोलनात उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागभीड तालुक्यातील सर्व विज ग्राहकांनी उत्‍स्‍फुर्तपणे सहभागी होवुन राज्‍य सरकारच्‍या विरोधातील आपला असंतोष प्रकट केला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!