महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेतर्फे एक दिवसीय राज्यव्यापी - देशव्यापी धरणे आंदोलन संपन्न
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दि.३ फेब्रुवारी २०२१ ला धरणे आंदोलन व एक दिवसाच्या राज्यव्यापी - देशव्यापी संप करून ऊर्जागड, प्रशासकीय भवन महावितरण गडचिरोली कार्यालया समोर द्वारसभा घेण्यात आली. १) विद्युत (संशोधन) बिल व स्टॅन्डर्ड बिडिंग डाक्युमेंट रद्द करा २) अस्तित्वांत असलेल्या सर्व फ्रॅन्चाईसी रद्द करा , केन्द्र शासित प्रदेशांतील खाजगीकरणाची प्रक्रिया बंद करा ३) तिन्ही पॉवर कंपन्याचे केरळ स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड मर्या. व हिमाचल प्रदेश राज्य वीज मंडळ मर्या. या प्रमाणे एकत्रीकरण करा ४) नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करा ५) सक्तीच्या सेवानिवृत्ती योजनेचे प्रावधान रद्द करा ६) सर्व कंत्राटी /आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना, तेलंगाणा वीज उद्योगाप्रमाणे कायम करा ७) 'फिक्स टर्म एक्प्लायमेंट' ही नवीन ठेकेदारी पध्दत रद्द करा ८) सर्व रिक्त पदावर कायम कर्मचारी म्हणून भरती राबवा. या सर्व मागण्या घेऊन निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे जी. बी. बुरमवार झोनल उपाध्यक्ष , घनश्याम लाकडे झोनल सचिव महापरेशन, संजय सोनूले सर्कल सचिव,
यु.आर पतालीया सर्कल अध्यक्ष, प्रमोद रडके सर्कल संघटक, राजू हेलवडे विभागीय सचिव यांनी द्वारसभेला संबोधित केले व संचालन रंजन बल्लामवर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!