रिक्त राहिलेल्या ट्रेडच्या आय.टी. आय . प्रवेशाची समुपदेशन फेरी ..




गडचिरोली (प्रतिनिधी )
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील यापुर्वी झालेल्या  प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या  १६५ जागा संस्थास्तरीय  पुनश्चः समुपदेशन फेरीद्वारे भरण्यात येत आहे. त्यानुसार वेळापत्रक  जाहिर झालेले आहे . करीता   इच्छूक उमेदवारांनी संकेत स्थळावर  प्रवेशासाठी अर्ज करणे, दुरूस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे   दि.३  ते ७ फेब्रुवारी  या दरम्यान  समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागाचा अभ्यास करून  उमेदवारांनी प्रवेशासाठी आपल्या लाॕगइनवरून  समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करावी. दि ८ फेब्रुवारीला  ह्या फेरीसाठी  गुणवत्ता यादी   संकेतस्थळावर    प्रकाशित होईल. दि.९ फेब्रुवारी  ते १५  फेब्रुवारी   या दरम्यान  उमेदवारांना  दिलेल्या संदेशात नमुद संस्थेत  दररोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व्यक्तीशः स्वतंत्ररीत्या  हजेरी  लावावी .  त्याचदिवशी  समुपदेशन फेरीसाठी  दुपारी १ वाजता  गुणवत्ता यादी प्रकाशित होईल  आणि उपलब्ध जागेनुसार जागेचे वाटप होईल. याकरिता उमेदवारांनी  मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे आणि उमेदवारांनी समुपदेशन फेरीचा लाभ घ्यावा  , असे प्राचार्य संतोष साळुंके यांनी कळविले आहे. तसेच काही शंका किंवा अडचण असल्यास प्रवेश प्रमुख श्री. मधूपवार किंवा श्री.  नितिन श्रीगिरीवार यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!