कवठाळा गट ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत युवा नेतृत्व करणाऱ्या अपक्ष उमेदवाराचा विजय


चंद्रपूर : - चिमूर पासून ७ किमी अंतरावरील कवठाळा येथील गट ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत युवा नेतृत्व करणाऱ्या अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. यामध्ये सरपंचपदी युवा नेतृत्व प्रविण विष्णुजी  सावसाकडे तर उपसरपंचपदी रमेश हिरालाल काळे यांची निवड झाली. सरपंच पदी निवडून आलेले प्रविण  विष्णुजी सावसाकडे यांनी गोपीचंद महादेव दांडेकर यांचा घनघनीत पराभव केला तर रमेश हिरालाल काळे हे बिनविरोध निवडून आले या निवडणुकीने सावसाकडे व दांडेकर या घराण्याच्या ६५ वर्षाच्या राजकीय संबंधाला किनार लागलेली दिसते.युवा नेतृत्वाने हा फार मोठा बदल घडवून आणला आहे.कोणत्याही राजकीय पक्षाचे चमचे व गमचे यांचे सहकार्य न घेता सावसाकडे पॅनल ने हा घवघवीत विजय प्राप्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!