बल्लारपूर नगर परिषदेच्या 3 जागांसाठी उपचुनाव होण्याची शक्यता : केवळ 7 महिने मिळण्याची शक्यता
बल्लारपूर नगर परिषदेच्या 3 जागांसाठी उपचुनाव होण्याची शक्यता : केवळ 7 महिने मिळण्याची शक्यता
बल्लारपूर(वसंत मून )
२०२१ च्या ऑक्टोम्बर-नोव्हेम्बर दरम्यान बल्लारपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडणार आहे.
तत्पूर्वी जात पळताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आल्यामुळे प्रभाग क्र. 15 अ ची नगरसेविका सुमनसिंग व प्रभाग क्र. 9 अ चे नगरसेवक नरसय्या येनगदंलावार च्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर एप्रिल महिन्यात उपचुनाव होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 3 अ च्या नगरसेविका भावना बाळू गेडाम यांच्या दीर्घ आजाराने 7 फरवरी ला झालेल्या निधनामुळे सुध्दा पद रिक्त झाले आहे त्यामुळे बल्लारपूर शहरात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकी पूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे शिवाय यादरम्यान होणाऱ्या उपनिवडनुका मुळे नवीन निवडून येणाऱ्या नगरसेवकांना जवळपास 6 ते 7 महिन्याचा कालखंड मिळणार आहे या करिता राजकीय पक्ष किती हिरारीने भाग घेतात हे पाहणे औसूत्याचे ठरेल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!