पालकमंत्री यांचा चिमूर दौरा आणि विरोधकांनी लावली पालकमंत्र्याला हद्दपार करण्याची फलके
लोकशाहीचा विरोध करीत फाडली पोलिसांनी फलके
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्याचा संपूर्ण भारतात फार मोठा नाव आहे. भारत स्वतंत्र होण्याअगोदर चिमूर हे गाव स्वतंत्र झाले.त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्या सारखे दिग्गज नेते चिमूर शहरातून लोकसभा निवडणूकीकरिता नामांकन दाखल करून राजकारणात उच्चाक गाठून मोठ्या पदावर पोहोचले असेच मोठ - मोठे दिग्गज नेते या चिमूर नगरीतून निवडून येऊन मोठे नेते म्हणून ओळखले जातात. असेच शिवसेना आणि नंतर काँग्रेस पक्षाचे २ वेळा आमदार ,राज्यमंत्री,चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे आता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत यांनी मागील गेली ३ रेझिम विधानसभा निवडणुकीत चिमूर विधानसभा क्षेत्रात उच्चाक गाठत जनतेला मोठ - मोठी चिमूर जिल्ह्याची खोटी आश्वासने दिली.आणि आता ब्रम्हपुरी जिल्हा करणार अशी खोटी आश्वासने देत चिमूर वासीय जनतेला भूतलफा देत असून जिथे गेला , तिथे जिल्हा अशा दिशाभूल करणाऱ्या पालकमंत्र्याला हद्दपार करा ...! चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे....! अशी आक्रमक फलके लावण्यात आली.आणि या फलकांना लोकशाही विरोधी समजून चिमूर पोलिसांनी फलके काडून फाडून स्वतःच्या शासकिय वाहनाने नेली आणि काही फलके नगर परिषदेच्या स्वाधीन केली हा सर्व पाया लोकशाही विरोधी नसून लोकहितासाठीचा होता हा सर्व प्रकार पालकमंत्र्यांच्या सांगण्यानुसार असावा आणि पोलिसांनी फलके फाडली हा फार चुकीचा प्रकार चिमूर शहरात घडला यास म्हणावे तरी काय ? यावर मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यात विरोधकांमध्ये व जनतेमध्ये चर्चा रंगली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!